Top News

युगेंद्रदादा पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत संयुक्त जयंती उत्साहात साजरा! स्नेहभोजन व भेटवस्तूंचे वाटप

 महापुरुषांच्या विचारातून समता आणि बंधुत्वाचा संदेश; अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न.

बारामती : तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त बारामती येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात सामाजिक ऐक्य, समता आणि बंधुत्वाचा संदेश देत सर्वधर्मीय नागरिकांनी मोठी उपस्थिती दर्शवली.


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त उत्सव समिती आणि संघर्षशक्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. जयंतीनिमित्त केवळ औपचारिकता न पाळता सामाजिक बांधिलकी जपत स्नेहभोजन आणि भेटवस्तू वाटपाचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. यावेळी उपस्थित नागरिकांशी संवाद साधताना मान्यवरांनी महापुरुषांच्या विचारांची आजच्या काळात असलेली गरज अधोरेखित केली.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते मा. युगेंद्रदादा पवार उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विविध उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला. तसेच प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक मा. किरणभाऊ इंगळे, मा. राजेंद्र नाना सोनवणे, मा. प्रशांत नाना सातव, मा. प्रतीक शेठ ढवाण पाटील, मा. अभिजित भाऊ घाडगे, मा. विशाल भाऊ हिंगणे, मा. गणेश काका जोजारे, मा. विशाल भाऊ जाधव यांच्यासह अनेक प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती लाभली.

मा. चिऊशेठ जजिंरे, मा. प्रताप आबा पागळे, मा. अनिताताई गायकवाड, मा. सोमनाथ गजाकस, मा. अजिजभाई शेख, मा. विपुल आण्णा ढवाण पाटील, मा. अक्षय भैय्या शेरे, मा. योगेश नालंदा, मा. जमीरभाई सय्यद, मा. धनंजय भाऊ जमदाडे, मा. शुभम अहिवळे, मा. गौरव अहिवळे, मा. अमोल कुलट, मा. निलेश आप्पा साळुंखे, मा. संभाजी माने, मा. राजेश कांबळे, मा. अजय लालबिगे, मा. बाळासो गायकवाड, मा. अतुल शेठ पवार, मा. प्रतीक शेठ जोजारे आणि मा. कृष्णमुर्ती जगताप यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मा. योगेश संजय महाडीक, ॲड. चैतन्य भैय्या गालिंदे, अस्लमभाई तांबोळी, सोनू दादा लोणकर, राहुल शेठ भापकर, महामुनी मामा, विनायक कांबळे गुरुजी, वसीमभाई तांबोळी यांच्यासह रणजीत मोतीकर, समीर शहा, वसीम बागवान आणि अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

"महापुरुषांचे विचार हे केवळ पुस्तकात न राहता ते कृतीत आणणे गरजेचे आहे. आजच्या या उपक्रमाने समाजातील सर्व घटकांना एकत्र आणण्याचे काम केले आहे," असे मत यावेळी आयोजकांनी व्यक्त केले.

Post a Comment

Previous Post Next Post