वालचंदनगर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई करत १९,७१,६००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त
प्रतिनिधी सागर कबीर, वालचंदनगर : गेले काही दिवसांपासुन पुणे ग्रामीण जिल्हामध्ये दुचाकी वाहने, घरफोडी, जबरी चोरीचे प्रमाण वाढले होते. त्याअनुषंगाने मा. संदीपसिंह गिल्ल साो पोलीस अधीक्षक, तसेच मा. गणेश बिरादार सो अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग, व मा. डॉ. सुदर्शन राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग यांनी वेळावेळी सर्व प्रकारच्या चोरीचे प्रमाण कमी करण्यासाठी काय उपाय योजना कराव्यात तसेच दाखल चोरीचे गुन्हे कसे उघडकीस आणता येतील याबाबत वेळोवेळी आढावा बैठकीमध्ये व व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे सुचना देवुन मार्गदर्शन केले होते. त्याअनुषंगाने वालचंदनगर पोलीस स्टेशन मधील घरफोडी, चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेसाठी तपास पथकामधील अंमलदार व स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार हे मा. वरिष्ठांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे सुयंक्तरित्या गोपनीय बातमीदार सर्तक करुन व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत होते.
दिनांक २७/०४/२०२६ रोजी मौजे कळंब, ता. इंदापुर गावचे हद्दीमधील डोंबाळे वस्तीवर श्री. संत बाळुमामा पालखी मुक्कामासाठी आल्याने पालखीच्या आरतीसाठी गावातील लोक हे आरतीसाठी गेलेले असताना त्यांचे घराचे कुलूप तोडुन घरातील सोने, चांदीचे दागिने व रोख रक्कम अशी १९,९६,०००/- रुपयांचा ऐवज अज्ञात चोरटटयाने चोरुन नेल्याने इसम नामे राहुल दत्तात्रय डोंबळे, वय ३५ वर्षे, रा. कळंब, ता. इंदापुर, जि. पुणे यांनी फिर्यादी दिल्याने वालचंदनगर पोलीस स्टेशन गु. रजि. नंबर १२८/२०२६ बी.एन.एस कलम ३०५ (अ), ३३१ (४) प्रमाणे गुन्हा दाखल झाला.
त्याअनुषंगाने वालचंदनगर पोलीस स्टेशन तपास पथकातील पोलीस अंमलदार व स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार हे सदर गुन्हामधील अनोळखी आरोपीचा सी.सी.टी.व्ही फुटेज तसेच गोपनीय बातमीदार यांच्या मदतीने शोध घेत असताना त्यांना गोपनीय बातमीदार यांच्या मार्फतीने बातमी मिळाली की, भवानीनगर येथील बाजारपेठ मध्ये एक गडद निळया काळया रंगाच्या पट्टा असलेला शर्ट व खाकी रंगाची पॅन्ट घातलेला एक इसम हा तेथील स्थानिक नागरिकांना बिना पावतीचे सोने कोणता जेव्लर्स घेतो याबाबत विचापुरस करत असुन त्याच्या हालचाली या संशयास्प्द असल्याचे दिसुन येत आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी वालचंदनगर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेकडील अंमलदार हे तात्काळ सदर ठिकाणी जावुन त्यांनी मिळालेल्या माहितीमधील इसमाचा शोध घेत असताना सदर इसम हा भवानीनगर कारखाना समोरील मोकळया जागेतुन लाकडी गावाकडे जाणा-या रोडच्या कडेला असलेल्या झाडाखाली बसलेला दिसला. त्यावेळी त्यास पोलीस आल्याची चाहुल लागताच तो पळुन जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यास वरील स्टाफने शिताफीने पकडुन ताब्यात घेतले. त्यावेळी सदर इसमाच्या हालचाली व देहभोली ही संशायास्पद वाटल्याने त्यास पोलीस स्टेशन येथे आणुन त्यास विश्वासामध्ये घेवुन चौकशी केली असता त्याने आपले नाव बाळासो ऊर्फे अजित प्रकाश पाटील, वय २७ वर्षे, धंदा मजुरी, रा. सध्या मौजे पुनगांव, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर असे सांगितले. त्यानंतर सदर इसमाकडे सखोल तपास केला असता सदर इसमाने मौजे कळंब, ता. इंदापुर, जि. पुणे गावचे हद्दीमध्ये डोंबाळे वस्तीवर चोरी केल्याचे कबुली दिल्याने आरोपीस दाखल गुन्हामध्ये दिनांक २८/०४/२०२६ रोजी अटक करण्यात आली. तसेच सदर आरोपीवर कोल्हापूर जिल्हातील पोलीस स्टेशनमध्ये घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे.
त्यानंतर सदर आरोपीची पोलीस कोठडी घेवुन तपासा दरम्यान आरोपीकडुन राहुल डोंबाळे यांचे घरामध्ये चोरलेले १६,१८,५००/- रुपये किंमतीचे ११.५ तोळे सोने दागिने, तसेच ३,७८,१०० रुपये किंमतीचे चांदीचे दागिने व रोख रक्कम असता २५,०००/- रुपयांचा असा एकुण १९,७१,६००/- रुपयांचा मुद्देमाल हा आरोपीकडुन जप्त करण्यात आला आहे. तरी सदर गुन्हयाचा तपास वालचंदनगर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि राजकुमार डुणगे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही मा. श्री. संदीपसिंह गिल्ल साो पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण, मा.श्री. गणेश बिरादार, अपर पोलीस अधिक्षक बारामती विभाग, मा.श्री. डॉ. सुर्दशन राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग व मा. प्रमोद क्षिरसागर साो, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सपोनि राजकुमार डुणगे, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि कुलदीप संकपाळ, श्रेपासई बाळासाहेब कारंडे, पोलीस हवालदार शैलेश स्वामी, गुलाबराव पाटील, किर्तीलाल गायकवाड, दादासाहेब डोईफोडे, स्वप्नील अहिवळे, अभिजीत एकशिंगे व पोलीस अंमलदार विक्रमसिंह जाधव, अभिजीत कळसकर, गणेश वानकर यांनी केली आहे.

Post a Comment