Top News

दौंड, बारामती व इंदापूरमध्ये जमावबंदी लागू

पुणे जिल्ह्यातील दौंड, बारामती आणि इंदापूर तालुक्यांमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम १६३ अंतर्गत हे आदेश जारी केले आहेत. 2025-26 च्या उन्हाळी अवर्तन काळात खडकवासला मुठा-उजवा कालव्याचे पाणी वितरण सुरळीत पार पडावे, यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे. खडकवासला मुठा-उजवा कालव्याच्या दोन्ही बाजूंना १०० मीटर परिसरात शेटफळगडे, अकोले, पारवडी, निरगुडे, कळस, लोणी देवकर, रावणगाव, नंदादेवी, मळद, शिर्सूफळ, गिरीम, गोपाळवाडी, माळवडी, मेरगळवाडी तसेच इंदापूर तालुक्यातील संबंधित परिसर. या भागांमध्ये जमावबंदी लागू राहणार आहे. तर या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता 2023 कलम २२ नुसार तसेच प्रचलित कायद्यांनुसार कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.




Post a Comment

Previous Post Next Post