बारामती (प्रतिनिधी) :
सूर्यनगरी येथील नामांकित अँक्टिव्ह किड्स इंटरनॅशनल स्कूलमध्ये १ मे 'महाराष्ट्र दिन' आणि 'आंतरराष्ट्रीय कामगार दिन' मोठ्या उत्साहात आणि अभिमानाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचे स्मरण करत, शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेल्या ध्वजारोहणाचा मान श्री. रमेशदादा देवकाते पाटील (व्हॉइस चेअरमन, एस.पी. नागरी सहकारी पतसंस्था) यांना देण्यात आला. व त्यांच्या शुभहस्ते तिरंगा फडकवण्यात आला आणि राष्ट्रगीत व राज्यगीताच्या सुरांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. यावेळी उपस्थितांनी तिरंग्याला मानवंदना देत 'जय महाराष्ट्र'च्या घोषणा दिल्या.
याप्रसंगी व्यासपीठावर श्री. विक्रांत देवकाते पाटील यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष आणि बारामतीतील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व श्री. राहुल बनकर सर (अध्यक्ष, अँक्टिव्ह किड्स इंटरनॅशनल स्कूल, चेअरमन, एस.पी. नागरी सहकारी पतसंस्था) उपस्थित होते. तसेच संस्थेचे संचालक श्री. सचिन नगरे यांनीही आपली उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शुभांगी बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा अत्यंत नेटकेपणाने पार पडला. महाराष्ट्र दिनाचे महत्त्व विशद करताना मान्यवरांनी सांगितले की, मुलांमध्ये लहानपणापासूनच आपल्या राज्याच्या संस्कृतीबद्दल आणि इतिहासाबद्दल आदर निर्माण करणे ही काळाची गरज आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंदाने विशेष परिश्रम घेतले. सौ. रेवती पाटील, सुमैय्या शेख, मिनाक्षी गोसावी, अर्चना चौधरी, रेश्मा काळे, अश्विनी थोरात, प्रज्ञा वालेकर, ज्योती भोसले, अंजना मासाळ यांसह संपूर्ण स्टाफने उपस्थित राहून कार्यक्रमात मोलाचे योगदान दिले.
अँक्टिव्ह किड्स इंटरनॅशनल स्कूलने आपल्या दर्जेदार शिक्षण पद्धतीमुळे बारामती आणि फलटण परिसरात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. शाळेच्या तीनही शाखांमध्ये अशा प्रकारचे सांस्कृतिक आणि राष्ट्रीय सण उत्साहाने साजरे केले जातात.
सूर्यनगरी, बारामती, माळेगाव, बारामती, आसू, फलटण
प्रवेशासाठी किंवा अधिक माहितीसाठी पालकांनी ९९२२५५६६७४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. शेवटी, उपस्थितांचे आभार मानून आणि अल्पोपहार घेऊन या दिमाखदार सोहळ्याची सांगता करण्यात आली.
Post a Comment