Breaking News

10/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

बारामती शहरातील साठे नगर आणि आमराई परिसर झोपडपट्टी मुक्त कधी होणार ?

बारामती (प्रतिनिधी: सुशांत सोनवणे) : बारामती नगरपालिकेच्या हद्दीतील कसबा भागातील साठे नगर आणि आमराई झोपडपट्टीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. "झोपडपट्टी मुक्त बारामती"च्या घोषणा होत असल्या तरी, साठे नगरचे पुनर्वसन अद्याप का रखडले आहे? असा संतप्त सवाल आता स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. प्रलंबित पुनर्वसन आणि तांत्रिक अडचणी साठे नगरमधील पुनर्वसनाचा मार्ग मोकळा करण्यात अनेक तांत्रिक अडचणी आहेत. विशेषतः साठे नगरमधील काही घरे ही सोसायटीच्या जागेवर किंवा त्या स्वरूपाच्या कायदेशीर पेचात अडकली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून येथील रहिवासी हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत आहेत, मात्र अद्याप ठोस कार्यवाही झालेली नाही. गेल्या काही दिवसापूर्वी महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री, अजितदादा पवार यांचे विमान अपघातात निधन झाले असून, आता महाराष्ट्राची व बारामती तालुक्याची सर्व जबाबदारी हि उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांच्यावर आहे. आता बारामती सारख्या विकसित शहराचा विकास अजून चांगला कसा होईल या कडे उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार लक्ष देतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

सत्ताधारी आणि प्रशासकीय स्तरावर हालचाली झाल्यास साठे नगर आणि आमराई खऱ्या अर्थाने 'झोपडपट्टी मुक्त' होऊ शकते. मात्र, सोसायटीच्या घरांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी विशेष धोरणाची गरज आहे. येणाऱ्या काळात जर प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी यावर कायमस्वरूपी तोडगा काढला नाही, व  "पुनर्वसन न झाल्यास येणाऱ्या काळात मोठे जनआंदोलन छेडले जाईल," असा इशारा रहिवाशांनी दिला आहे. आता हा प्रश्न सुटणार की साठे नगर व आमराई परिसरातील रहिवासी यांची प्रतीक्षा अधिक लांबणार, हे येणारा काळच ठरवेल.



Post a Comment

0 Comments