मुंबई : "महाराष्ट्र हे देशाचे आर्थिक पॉवरहाऊस असून, राज्याला २०४७ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्याचा आम्ही 'महा-संकल्प' केला आहे. हा केवळ आकडा नसून तज्ज्ञांच्या मदतीने आखलेला १६ प्रमुख क्षेत्रांचा एक ठोस 'रोडमॅप' आहे," असे प्रतिपादन आज मुंबईत करण्यात आले. मुंबईत आयोजित 'लोकसत्ता जिल्हा निर्देशांक' सोहळ्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांचा आणि उपजिल्हाधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी राज्याच्या भविष्यातील आर्थिक प्रगतीचा आणि नियोजनाचा आढावा घेण्यात आला. विविध विकास निर्देशांकांमध्ये प्रशासकीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासामुळेच राज्याचा हा 'महा-संकल्प' पूर्ण होण्यास मदत होणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. तसेच महाराष्ट्राला प्रगत करण्यासाठी शासनाने १६ प्रमुख क्षेत्रांची निवड केली आहे. यामध्ये थेट परकीय गुंतवणुकीत राज्याचे अव्वल स्थान कायम राखणे. उत्पादन क्षेत्र रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणे. नवउद्योजकांना जागतिक दर्जाच्या सोयी पुरवणे. तसेच सर्व योजनांच्या अंमलबजावणीसाठी ठोस आर्थिक तरतूद करणे. २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या प्रवासात महाराष्ट्र हे मुख्य इंजिन म्हणून काम करत आहे. केवळ दस्तऐवजीकरण न करता, प्रत्यक्ष कृती आराखडा तयार करून हा 'महा-संकल्प' सिद्ध करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. हा सामूहिक प्रवास महाराष्ट्राला ५ ट्रिलियन डॉलर्सच्या ऐतिहासिक टप्प्यावर नेऊन ठेवेल, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवाणीस यांनी व्यक्त केला.

0 Comments