Breaking News

10/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

युगेंद्र पवारांचे बारामतीच्या प्रांताधिकाऱ्यांना गॅस व पाणीटंचाई बाबत लेखी निवेदन

बारामती: शहरासह तालुक्यात सध्या जाणवणारी गॅस टंचाई आणि उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर निर्माण होणारी संभाव्य पाणीटंचाई, या गंभीर प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज बारामती येथील प्रांताधिकारी कार्यालयावर धडक देण्यात आली. यावेळी प्रांताधिकारी वैभव नावडकर यांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांचे लेखी निवेदन सादर करण्यात आले. जागतिक घडामोडींचा परिणाम आता ग्रामीण भागातही जाणवू लागला असून, घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे अनेक हॉटेल व्यावसायिकांना आपले व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ आली आहे. तसेच या व्यवसायांवर अवलंबून असलेल्या कामगारांच्या उपजीविकेचा प्रश्न गंभीर झाला आहे. सर्वसामान्य नागरिकांनाही वेळेवर गॅस मिळत नसल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे. यावर प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, तसेच पाणीटंचाई बाबत त्यांनी मार्च महिन्यातच उन्हाची तीव्रता वाढल्याने एप्रिल-मे महिन्यात पाण्याची परिस्थिती बिकट होण्याची शक्यता आहे. त्यासाठी 'मास्टर प्लॅन' तयार करून लवकरच उपाययोजना राबवाव्यात तसेच दरवर्षीप्रमाणे टँकरवर अवलंबून राहण्याऐवजी उपलब्ध जलसाठ्याचे काटेकोर नियोजन करावे. व पिण्याचे पाणी, पशुधन आणि शेतीसाठी पाण्याचे योग्य वाटप व्हावे व पाणी व्यवस्थापन आणि वितरणामध्ये पारदर्शकता आणून टंचाईग्रस्त गावांना प्राधान्य द्यावे. असे निवेदन युगेंद्र पवारांनी बारामतीचे प्रांताधिकारी वैभव नावडकर यांना दिले या प्रसंगी सुभाषआप्पा ढोले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे बारामती तालुकाध्यक्ष ॲड. राजेंद्रबापू जगताप, बारामती नगरपरिषदेच्या विरोधी पक्षनेत्या आरतीताई शेंडगे-गव्हाळे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुशील सोमाणी, स्वीट होम असोसिएशनचे अध्यक्ष प्रविण आहुजा, व्यापारी महासंघाचे खजिनदार महेश ओसवाल, युवक शहराध्यक्ष बळराज पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments