Breaking News

10/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

सौ. रुपाली चाकणकर यांचा महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा

मुंबई: नाशिकमधील तथाकथित भोंदूबाबा अशोक खरात ऊर्फ ‘कॅप्टन खरात’ याच्यावर बलात्काराचे गंभीर गुन्हे दाखल झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचे थेट पडसाद उमटले असून, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज, २० मार्च २०२६ रोजी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. अशोक खरात याच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप झाल्यानंतर सोशल मीडियावर काही व्हिडिओ तुफान व्हायरल झाले होते. यामध्ये रुपाली चाकणकर या खरातच्या ‘श्री शिवनिका संस्थान’ मध्ये विश्वस्त असल्याचे आणि खरातची पाद्यपूजा करत असल्याचे दिसून आले. या व्हिडिओंमुळे महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर असलेल्या चाकणकर यांच्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. पीडित महिलांना न्याय देणाऱ्या संस्थेच्या प्रमुखाचेच आरोपीशी असलेले संबंध नैतिकदृष्ट्या चुकीचे असल्याची भूमिका जनतेने आणि विरोधकांनी लावून धरली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर रुपाली चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा करून आपला राजीनामा त्यांच्याकडे सुपूर्द केला. 

"या प्रकरणाचा निष्पक्ष तपास व्हावा आणि तपासावर कोणताही राजकीय दबाव येऊ नये, यासाठी मी पदाचा त्याग करत आहे," अशी भूमिका चाकणकर यांनी मांडल्याचे समजते.





Post a Comment

0 Comments