Top News

अखिल बारामती भोई समाज संस्थेचा सुनेत्रावहिनी पवार यांना जाहीर पाठिंबा!

​बारामती : बारामती विधानसभा पोटनिवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, बारामतीमधील सामाजिक संघटनांनी आपली भूमिका स्पष्ट करण्यास सुरुवात केली आहे. याच अनुषंगाने, अखिल बारामती भोई समाज संस्था आणि बारामती शहरातील तमाम भोई समाज बांधवांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आणि महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री आदरणीय श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांना जाहीर पाठिंबा घोषित करण्यात आला आहे. ​दि. १५ एप्रिल २०२६ रोजी, संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. सतिश श्रीराम करंजे यांच्या हस्ते जाहीर पाठिंब्याचे अधिकृत पत्र 'सहयोग' निवासस्थानी सुपूर्द करण्यात आले.

​भोई समाजाने नेहमीच विकासाच्या राजकारणाला साथ दिली आहे. उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर आणि ध्येयधोरणांवर विश्वास ठेवून, समाज बांधवांनी या पोटनिवडणुकीत सुनेत्रावहिनींना बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार केला आहे. "आम्ही सर्व भोई समाज बांधव अजितदादांच्या विचारांशी एकनिष्ठ राहून काम करत राहू," अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. ​या महत्त्वपूर्ण प्रसंगी भोई समाजाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, यात ​सतिश करंजे (अध्यक्ष), ​शंकर मोरे (उपाध्यक्ष), ​संदिप भोई, मुकुंद तारू, अतुल सुपेकर, ​कुमार भोकरे (फोटोग्राफर), बाळासाहेब बोलके, अतुल जाधव यांच्यासह समाज बांधवांची मोठी उपस्थिती लक्षवेधी ठरली.
​या पाठिंब्यामुळे बारामती विधानसभा क्षेत्रात सुनेत्रावहिनी पवार यांची बाजू अधिक भक्कम झाली असून, भोई समाजाच्या या निर्णयाचे राजकीय वर्तुळात स्वागत होत आहे

Post a Comment

Previous Post Next Post