Top News

बारामती नगरपरिषदेच्या श्रीरामनगर शाळेत गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप; 'आस प्रतिष्ठान'ची सामाजिक बांधलकी


बारामती : येथील बारामती नगरपरिषदेच्या श्रीरामनगर मधील शाळेतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. 'आस प्रतिष्ठान, भारत' या संस्थेने दरवर्षीची आपली परंपरा आणि सामाजिक बांधलकी जपत याही वर्षी या कौतुकास्पद उपक्रमाचे आयोजन केले होते.

या उपक्रमांतर्गत बालवाडी ते प्राथमिक शाळेतील गरजू मुला-मुलींना पाटी, पेन्सिल, पेन, थ्री-इन-वन वही, कंपास, वॉटर बॅग, टिफिन बॉक्स, एकरेगी वही, उजळणी, तेलखडू (क्रायॉन्स), स्केच पेन, खोडरबर आणि शॉपनर इत्यादी आवश्यक शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच हक्काचे साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

या प्रसंगी अंगणवाडी सेविका विजया जगताप, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता देशमुख, 'आस प्रतिष्ठान, भारत'च्या अध्यक्षा सौ. सुप्रिया जगताप, श्री. प्रशांत गाढवे, श्री. आलताब मुलाणी, खरेदी-विक्री संघाचे सभापती श्री. विनायक गावडे, श्री. पंकजभाऊ भोसले, तसेच माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक श्री. प्रशांत शिंदे पाटील उपस्थित होते.

या सामाजिक उपक्रमाला उद्योजक श्री. मंगेश वेदपाठक, श्री. जमीर बागवान, बागायतदार श्री. बापूराव मोरे व जरीना इनामदार यांनी मोलाची मदत केली. याबद्दल आस प्रतिष्ठानचे सचिव श्री. शिहान गणेश (बाबा) भीमराव जगताप यांनी सर्व देणगीदारांचे व उपस्थितांचे आभार मानले, तसेच भविष्यातही अशाच सामाजिक उपक्रमांना सर्वांची साथ मिळावी अशी इच्छा व्यक्त केली.

या स्तुत्य उपक्रमाबद्दल श्रीरामनगरचे नगरसेवक श्री. अभिजित जाधव, आमराईचे नगरसेवक श्री. बिरजूभैय्या मांढरे, शंकर नागरी पतसंस्थेचे गजानन काळे, श्री. सुनील शिंदे आणि श्री. अतुलशेट गोटे यांनी 'आस प्रतिष्ठान, भारत'च्या सर्व सभासदांचे व आर्थिक मदत करणाऱ्यांचे विशेष आभार मानले. प्रतिष्ठानने आपले सामाजिक ऋण फेडत हे सेवाकार्य असेच निरंतर चालू ठेवावे, अशा शुभेच्छाही त्यांनी या वेळी दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post