"साहेब, आमचं २३ दिवसांचं निष्पाप बाळ गेलं हो... तरी या नराधमांना पाझर फुटला नाही!" एका हतबल बापाचा हा आक्रोश ऐकून पत्थराच्या काळजालाही पाझर फुटेल;
पण बारामतीतील एका नामांकित रुग्णालयाच्या डॉक्टरांना आणि त्यांच्या मुजोर मेडिकल प्रशासनाला याचे काहीच सोयरसुतक उरलेले नाही! बारामतीमधील एका मेडिकलमधील दादागिरीचा आणि अमानुषतेचा प्रकार सध्या समोर आला असून, यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून संतापाची लाट उसळली आहे.
९ महिने आर्थिक लूट, ऐनवेळी डॉक्टर गायब अन् चिमुरड्याचा अंत!
बारामती (प्रतिनिधी) सागर सूर्यवंशी : बारामतीतील डॉ. विशाल मेहता आणि डॉ. निकिता मेहता (मेहता हॉस्पिटल) यांच्याकडे एका कुटुंबाने मोठ्या विश्वासाने उपचार सुरू केले होते. नऊ महिने रोज महिलेच्या पायावर इंजेक्शन्स टोचून पाय सुजवले गेले, पायाला गाठी आल्या. डॉक्टर चांगले उपचार करतील या आशेने हे कुटुंब सर्व वेदना सहन करत राहिले.
परंतु, आठव्या महिन्यात जेव्हा ऐनवेळी सिझर करण्याची वेळ आली, तेव्हा मुख्य डॉक्टरच गायब होते! तब्बल ३ दिवस मुख्य डॉक्टर रुग्णालयात नव्हते. त्यांच्या अनुपस्थितीत कशाबशा झालेल्या सिझरनंतर बाळाची प्रकृती कमालीची बिघडली. पुण्यात तब्बल २३ दिवस तो लहानगा जीव मृत्यूशी लढला; पण शेवटी एका बापाचा कोवळा कोंब कोमेजला... बाळ जग सोडून गेले! एकीकडे पुण्यात बाळ मृत्यूशी झुंज देत होते, तर दुसरीकडे बारामतीत आई बेडवर जिंदगीची लढाई लढत होती. पत्नीला मानसिक धक्का बसू नये म्हणून पतीने बाळ गेल्याचे तिला सांगितले नव्हते. अशा भीषण मानसिक तणावात या मेहता हॉस्पिटलच्या मेडिकल चालकांनी 'अमानुषतेचा माज' दाखवला. पतीने काही औषधे बाहेरून स्वस्त दरात घेतली, फक्त याच एका कारणावरून त्या मेडिकलच्या कर्मचाऱ्यांनी रुग्णाच्या वृद्ध आई आणि सासूला साध्या दोन गोळ्या देण्यास चक्क नकार दिला! "आम्हाला डॉ. मेहतांचा कडक आदेश आहे, बाहेरून औषधे आणली तर आम्ही सुई देखील देणार नाही!" असा मुजोर आणि क्रूर पवित्रा घेतला गेला. या अमानुष दादागिरीचा रेकॉर्ड झालेला प्रकार आता चव्हाट्यावर आला आहे.
हा धंदा फक्त एका कुटुंबापुरता मर्यादित नाही! या मेहता हॉस्पिटलच्या अनेक काळ्या कहाण्या आता एकामागून एक बाहेर येत आहेत :
📍 एका रुग्णाच्या हाताचे ऑपरेशन केले, जे पूर्णपणे अपयशी ठरले!📍 अपघातातील एका महिला रुग्णाचे ऑपरेशन करून तिची अवस्था आणखी दयनीय
📍 सीजरच्या नावाखाली ९०,००0 रुपये उकळायचे आणि वरून स्वतःच्याच मेडिकलमधून
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात अवैध मेडिकल, औषधांचा काळाबाजार आणि मुजोर मेडिकल चालकांवर अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त IAS तुकाराम मुंढे यांनी कारवायांचा प्रचंड धडका लावला आहे. "नियम मोडला तर गय करणार नाही," हाच मुंढे साहेबांचा पॅटर्न आहे.
नियमानुसार कोणताही डॉक्टर किंवा मेडिकल चालक रुग्णाला त्यांच्याच मेडिकलमधून औषधे घेण्यासाठी सक्ती करू शकत नाही. बारामतीच्या या 'मेहता हॉस्पिटल' मधील मेडिकलमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांना ज्या पद्धतीने "बाहेरून औषधे आणली तर आम्ही औषधे देणार नाही," असे सांगून साध्या दोन गोळ्या नाकारण्यात आल्या, हा थेट FDA च्या नियमांचे उल्लंघन करणारा प्रकार आहे.
त्यामुळे आता बारामतीकरांचे लक्ष लागून राहिले आहे की...
📌 काय धडाकेबाज आयुक्त IAS तुकाराम मुंढे साहेब या मुजोर 'मेहता हॉस्पिटल'च्या मेडिकलचा परवाना तात्काळ रद्द् करणार?
📌 गोरगरीब रुग्णांना लुबाडणाऱ्या या 'मेडिकल माफिया'ला मुंढे साहेब स्वतःच्या स्टाईलने सरळ करणार का?
पैशांच्या हव्यासापोटी एका नवजात बाळाचा बळी घेणाऱ्या आणि रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या या डॉ. विशाल मेहता आणि डॉ. निकिता मेहता यांच्यावर आरोग्य विभाग आणि अन्न व औषध प्रशासन (FDA) कडक कारवाई करणार का? की अजून कोणाचा बळी जाण्याची वाट पाहिली जाणार? असा प्रश्न आता लोकांना पडू लागला आहे.

Post a Comment