Top News

रुपाली चाकणकर यांच्या अडचणीत वाढ एसआयटी (SIT) कडून सखोल तपास सुरू

नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी आणि अंकशास्त्रज्ञ अशोक खरात ऊर्फ कॅप्टन खरात याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक झाल्यानंतर, आता या प्रकरणाचे धागेदोरे राजकीय वर्तुळापर्यंत पोहोचले आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे नाव या प्रकरणात ओढले गेल्याने मोठी खळबळ उडाली असून विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. अशोक खरातवर एका २७ वर्षीय महिलेने गुंगीचे औषध देऊन वारंवार बलात्कार केल्याचा आणि त्याचे अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केल्याचा गंभीर आरोप केला आहे. नाशिक पोलिसांनी खरातच्या फार्महाऊसवर छापा टाकला असता तिथे पिस्तूल, काडतुसे आणि अनेक महिलांचे अश्लील व्हिडिओ असलेले पेनड्राइव्ह जप्त करण्यात आले आहेत. रुपाली चाकणकर या अशोक खरातची पाद्यपूजा करत असतानाचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामुळे खरात आणि चाकणकर यांच्यातील जवळीक समोर आली आहे. खरातच्या 'श्री शिवनिका संस्थान' या ट्रस्टमध्ये चाकणकर या विश्वस्त असल्याचे कागदपत्रे समोर आली आहेत. तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आरोप केला आहे की, खरातच्या सांगण्यावरून चाकणकर यांनी तंत्र-मंत्रासाठी स्वतःच्या हाताचे बोट कापले होते. या प्रकरणामुळे राष्ट्रवादी कॉंगेस पार्टी (अजित पवार गट) यांच्यात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. रुपाली पाटील-ठोंबरे यांनी चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी करत "महिला आयोगाच्या अध्यक्षाच अशा व्यक्तीला पाठीशी घालत असतील तर पीडितांना न्याय कोण देणार?" असा सवाल उपस्थित केला आहे. राज्य सरकारने या प्रकरणाच्या गांभीर्यामुळे तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे. हे पथक आता खरातच्या संपर्कातील सर्व बड्या नेत्यांची आणि सेलिब्रिटींची चौकशी करणार आहे.



Post a Comment

Previous Post Next Post