Top News

अजितदादांच्या निधनामुळे बारामतीचा मुस्लिम समाज यंदा 'ईद' साधेपणाने साजरी करणार...

बारामती : "ईद दरवर्षी उत्साहात येईल, पण आमचे लाडके नेते अजितदादा पवार आता पुन्हा कधीच येणार नाहीत," अशा अत्यंत जड अंतःकरणाने बारामती शहरातील समस्त मुस्लिम समाजाने यंदाचा ईदचा सण अत्यंत साध्या आणि संयमी पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. २८ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघाती निधनामुळे संपूर्ण राज्यात, विशेषतः बारामतीत अद्यापही शोककळा पसरलेली आहे. आपल्या लाडक्या लोकनेत्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मुस्लिम समाजाने एकजुटीने हा कौतुकास्पद निर्णय घेतला असून समाजात तसे आवाहनही केले आहे. 

"दादांचे बारामतीवर आणि इथल्या सर्वसामान्य जनतेवर जीवापाड प्रेम होते. त्यांच्या जाण्याने बारामती पोरकी झाली आहे. अशा दुःखाच्या काळात आनंद साजरा करणे आम्हाला पटणारे नाही. म्हणूनच आम्ही एकमताने सण साधेपणाने साजरा करत आहोत." — समस्त मुस्लिम समाज बांधव, बारामती.



Post a Comment

Previous Post Next Post