Top News

बारामतीत ‘अभय योजना २०२६’ जाहीर मालमत्ता कर दंडावर ५०% सवलत

बारामती नगर परिषद कडून थकबाकीदारांना मोठा दिलासा; ३१ मार्च ही अंतिम मुदत

बारामती : बारामती नगर परिषद यांच्या वतीने शहरातील थकबाकीदार मालमत्ताधारकांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. थकीत मालमत्ता करावरील शास्ती (दंड) रकमेमध्ये ५० टक्के सवलत देणारी ‘अभय योजना २०२६’ जाहीर करण्यात आली आहे. ही योजना मर्यादित कालावधीसाठी लागू असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. योजनेनुसार, मालमत्ता कराच्या थकीत रकमेवर लागणाऱ्या दंडावर थेट ५० टक्के सूट दिली जाणार आहे. मात्र, या सवलतीचा लाभ घेण्यासाठी संबंधित मालमत्ताधारकांनी आपली संपूर्ण थकबाकी आणि चालू वर्षाचा कर भरणे आवश्यक आहे. ही सवलत केवळ ३१ मार्च २०२६ पर्यंतच लागू राहणार असून त्यानंतर दंड माफीचा लाभ मिळणार नाही. नागरिकांच्या सोयीसाठी कर भरणा प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. अधिकृत वेबसाईट, मोबाईल ॲप तसेच QR कोडच्या माध्यमातून ऑनलाइन पेमेंट करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. “शहराच्या विकासात आपले योगदान द्या. दंडातील सवलतीचा लाभ घेण्याची ही शेवटची संधी असून, ३१ मार्चपूर्वी कर भरून कायदेशीर कारवाई टाळावी,” असे आवाहन नगर परिषदेमार्फत करण्यात आले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post