Breaking News

10/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

बारामती कप 2026 स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन

बारामती : लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ, 'युवा क्रांती जनकल्याण संघटना' व 'फुल & फायनल ग्रुप बारामती' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'बारामती कप २०२६' (पर्व ३) या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आज सोमवार, २३ मार्च रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम येथे उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाचे उद्घाटन बारामती नगर परिषदेचे नगराध्यक्ष मा. श्री. सचिन शेठ सातव यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी क्रीडा क्षेत्रातील आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. या उद्घाटन प्रसंगी बारामती नगर परिषदेचे आरोग्य सभापती मा. श्री. नवनाथ बल्लाळ, विरोधी पक्ष नेत्या, नगरसेविका मा. सौ. आरतीताई शेंडगे, युवा नेते मा. श्री. विशाल जाधव, कै. वस्ताद बाजीराव काळे दहीहंडी संघाचे अध्यक्ष मा. श्री. ऋतुराज (भैय्या) काळे आणि मा. श्री. सचिनभाऊ मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारे मा. श्री. तैनूर (भाई) शेख (पत्रकार - वतन की लकीर) आणि मा. श्री. सुरज देवकाते (पत्रकार - स्टार महाराष्ट्र न्यूज) हे देखील यावेळी उपस्थित होते. सलग तिसऱ्या वर्षी आयोजित होत असलेल्या या 'बारामती कप' मध्ये अनेक नामांकित संघ सहभागी झाले आहेत. उद्घाटन प्रसंगी बोलताना नगराध्यक्ष मा. श्री. सचिन शेठ सातव यांनी आयोजकांचे कौतुक केले आणि खेळाडूंना खिलाडूवृत्तीने खेळण्याचे आवाहन केले. या स्पर्धेच्या माध्यमातून स्थानिक खेळाडूंना एक मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. या भव्य आयोजनासाठी युवा क्रांती जनकल्याण संघटना व फुल & फायनल ग्रुपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत. क्रिकेट प्रेमींनी या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.



Post a Comment

0 Comments