बारामती : निरा डावा कालव्यामधील पाण्याचा प्रवाह बंद झाल्यामुळे आणि सध्या उपलब्ध असलेला पाणीसाठा मर्यादित असल्यामुळे बारामती नगर परिषदेने शहरात आणि ग्रामीण भागात पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवार दिनांक १८ जून २०२६ पर्यंत बारामती शहर, जळोची, रुई, तांदूळवाडी आणि बारामती ग्रामीण भागात नियमित पाणीपुरवठा केला जाईल. मात्र, त्यानंतर कालव्यातील प्रवाह पूर्ववत सुरू होईपर्यंत १ दिवसाआड (एक दिवस आड) पाणीपुरवठा केला जाणार आहे. बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंकज अनिल भुसे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे पाणी कपातीचे सविस्तर नियोजन जाहीर केले असून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.
जलशुद्धीकरण केंद्रनिहाय पाणी कपातीचे नियोजन खालीलप्रमाणे असेल :
१) पाटस रिंगरोड येथील जलशुद्धीकरण केंद्र (पाणी बंद राहणारे भाग) :
शुक्रवार, दिनांक १९/०६/२०२६ रोजी पाणी पुरवठा न होणारे भाग : म्हाडा कॉलनी, मुजावर वाडा, देवके इस्टेट, पानगल्ली, समर्थनगर, आमराई, सिद्धार्थनगर, विठ्ठलनगर, सुहासनगर, चंद्रमणीनगर, वडर सोसायटी, कोअर हाऊस इंदापूर रोड, एस.टी. स्टँड परिसर, सटवाईनगर, जवाहरनगर, पोस्ट रोड, हंबीरराव चौक, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, सिनेमा रोड विजयनगर, साईगणेशनगर, आकलित सोसायटी, अशोकनगर, आनंदनगर, मयुरेश्वर अपार्टमेंट, भिगवण रोड वसंतनगर, अवधूतनगर, वकील कॉलनी, तपोवन कॉलनी, विवेकानंद नगर, अवचट इस्टेट, ख्रिश्चन कॉलनी, महादेव मळा, सद्गुरूनगर, पतंगशहानगर, मेढरोड क्षत्रियनगर, श्रावण गल्ली, कोष्टी गल्ली, तांदूळवाडी देस चौक, सिद्धेश्वर गल्ली, मारवाड महावीर पथ, बुरुड गल्ली, नेवसे रोड, सुभाष चौक, कसाब गल्ली, कचेरी रोड.
शनिवार, दिनांक २०/०६/२०२६ रोजी पाणी पुरवठा न होणारे भाग : संपूर्ण कसबा फलटण रोड, रेणुकानगर, मुल्ला वस्ती, शिक्षक सोसायटी, लक्ष्मीनारायण नगर, माळेगाव रोड हनुमान नगर, माळेगाव कॉलनी, सातव वस्ती, शिवाजी नगर, जामदार रोड, कारभारी नगर, सावतामाळीनगर, श्रीरामनगर, चांदणी चौक, पंचशील नगर, साठेनगर, जगताप मळा, जुना मोरगाव रोड, खंडोबानगर, नवीन मोरगाव रोड संपूर्ण.
२) सायली हिल व जळोची येथील जलशुद्धीकरण केंद्र (पाणी बंद राहणारे भाग) :
शुक्रवार, दिनांक १९/०६/२०२६ रोजी पाणी पुरवठा न होणारे भाग: रुई संपूर्ण, ढेरेवस्ती, सायली हिल, सुर्यनगरी, देसाई इस्टेट, अंबिकानगर, जळोची गावठाण, बावळे वस्ती, तान्हाई नगर, महिला सोसायटी, प्रगतीनगर.
शनिवार, दिनांक २०/०६/२०२६ रोजी पाणी पुरवठा न होणारे भाग: तांदूळवाडी गावठाण, सहयोग सोसायटी, निरा कॅनॉल सोसायटी, दुधसंघ सोसायटी.

Post a Comment