Top News

बारामती शहर काँग्रेस युवक प्रभारी अध्यक्षपदी सुशांत सोनवणे यांची निवड

बारामती : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने देशभरात राबविण्यात येत असलेल्या 'संघटन सृजन' अभियानांतर्गत बारामतीमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यात पक्षाच्या बळकटीकरणासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असून, सुशांत दत्तात्रय सोनवणे यांची बारामती शहर काँग्रेस युवक प्रभारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष उमेश पवार यांच्या सूचनेनुसार ही निवड जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला तळागाळापर्यंत पोहचवून संघटना मजबूत करण्यासाठी 'संघटन सृजन' अभियान एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.


या निवडीच्या वेळी काँग्रेस पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते, त्यामध्ये प्रामुख्याने, योगेश एस. सी. (निरीक्षक, अखिल भारतीय काँग्रेस), 
प्रशांत जगताप (निरीक्षक, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस), श्रीरंग चव्हाण (पुणे जिल्हाध्यक्ष), अशोक इंगुले (बारामती शहराध्यक्ष), विश्वजित हप्ते (सचिव, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटी), आकाश मोरे (सचिव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी), याशिवाय विरधवल गाडे, वैभव बुरूंगले, सौरभ रूपनवर, सिद्धेश गवळी, सुरज भोसले, रोहित बनकर, ॲड. तुषार ओव्हाळ, निलेश गजरमल आणि भारत रामचंदे यांच्यासह बहुसंख्य काँग्रेस कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post