बारामती : महाराष्ट्र राज्याचे लाडके नेते आणि माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. दादांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात आता पोटनिवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर, राजकीय रणनीती आणि पुढील दिशा ठरवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कंबर कसली आहे.
याच पोटनिवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून उद्या, शनिवार दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी बारामतीत 'आढावा बैठकीचे' आयोजन करण्यात आले आहे. स्वर्गीय अजितदादांच्या निधनानंतर बारामतीची जबाबदारी आणि कार्यकर्त्यांना उभारी देण्यासाठी मा. श्री. जयदादा अजितदादा पवार हे या बैठकीत प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. पोटनिवडणुकीच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, यामध्ये जयदादा कार्यकर्त्यांशी काय संवाद साधतील या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बैठकीचे नियोजन शनिवार ४ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ४:०० वाजता राष्ट्रवादी काँग्रेस भवन, कसबा, बारामती. या ठिकाणी होणार असून या कठीण प्रसंगात पक्षाची ताकद एकवटण्यासाठी बारामती तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, बूथ कमिटी सदस्य, युवक आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या बैठकीस उपस्थित राहणे अनिवार्य असल्याचे सांगण्यात आले आहे. पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत बारामतीचा गड राखण्यासाठी या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे.
Post a Comment