ब्रेकिंग न्यूज

10/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

बारामती नगरपरिषदेकडून पगार वाढीचा शब्द पूर्ण जनशक्ती कंत्राटी कामगार संघाच्या लढ्याला यश

साखळी उपोषण स्थगित नगराध्यक्ष आणि आरोग्य सभापतींच्या मध्यस्थीने कंत्राटी कामगारांचे प्रश्न मार्गी

बारामती | प्रतिनिधी : बारामती नगरपरिषद कार्यक्षेत्रातील कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी 'जनशक्ती कंत्राटी कामगार संघा'ने पुकारलेल्या लढ्याला मोठे यश आले आहे. नगराध्यक्ष सचिन सातव आणि आरोग्य सभापती नवनाथ बल्लाळ यांनी आरोग्य विभागातील कामगारांच्या पगारवाढीचा दिलेला शब्द पूर्ण केला असून, एकाही कामगाराला कमी न करता त्यांच्या न्याय्य हक्कांचे रक्षण करण्याचे आश्वासन दिले आहे. या सकारात्मक निर्णयामुळे संघटनेच्या वतीने सुरू असलेले साखळी उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. कंत्राटी कामगारांच्या वेतन वाढीसह इतर विविध मागण्यांसाठी जनशक्ती कंत्राटी कामगार संघाचे संस्थापक अध्यक्ष गौरव रणधीर अहिवळे यांच्या नेतृत्वाखाली बारामती नगरपरिषदे समोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले होते. या उपोषणाची दखल घेत नगरपरिषद प्रशासनाने तातडीने चर्चा घडवून आणली. नगराध्यक्ष सचिन सातव, आरोग्य सभापती नवनाथ बल्लाळ आणि इतर नगरसेवकांनी कामगारांच्या प्रतिनिधींशी सकारात्मक चर्चा केली. तसेच नगराध्यक्ष सचिन सातव यांनी लेखी पत्र देऊन कामगारांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यांनी संबंधित ठेकेदारांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या असून, काही विभागांच्या ठेकेदारांनी या मागण्यांची अंमलबजावणी देखील सुरू केली आहे तर आरोग्य सभापती नवनाथ बल्लाळ यांनी आरोग्य विभागातील कामगारांचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार असल्याचे स्पष्ट केले. या वेळी उपोषण स्थगित करण्याचे पत्र देताना उपनगराध्यक्षा श्वेता नाळे, आरोग्य सभापती नवनाथ बल्लाळ, गटनेते संजय संघवी, विरोधी पक्ष नेत्या आरतीताई शेंडगे (गव्हाळे), नगरसेवक राजेंद्र सोनवणे, अमर धुमाळ, अमोल कावळे, सोमनाथ गजाकस आणि विशाल हिंगणे उपस्थित होते. तर या लढ्यामध्ये जनशक्ती कंत्राटी कामगार संघाचे शहर अध्यक्ष आकाश शिंदे, उपाध्यक्ष विजय मस्के, कार्याध्यक्ष निखिल सरोदे यांच्यासह महिला आघाडीच्या संगीता खरात, प्रतिभा वाघमारे आणि इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भविष्यातही कामगारांच्या हक्कासाठी संघटना कटिबद्ध राहील, असा विश्वास गौरव अहिवळे यांनी व्यक्त केला. कामगारांनी यावेळी नगरपरिषद प्रशासन, राजकीय पदाधिकारी आणि पत्रकारांचे आभार मानले आहेत.



Post a Comment

0 Comments